Longer sentences, up to 1500 words.
कासव आणि सशाची गोष्ट तुम्हाला माहीतच असेल. पण पुढे काय झाले त्यांचे? वाचा ’ससा आणि कासव’मध्ये.
समुद्राच्या तळाशी प्रवाळबेटांचं एक मस्त जग आहे. चला बघूया… तिथे अगदी वेगळेच आणि फार सुंदर असे समुद्री जीव दिसतील.
मोठं, छोटं, गोलगोल, चौकोनी, जड, हलकं. घरं खूप प्रकारची असतात...ती वेगवेगळ्या प्रकारची का असतात, ते समजून घेऊया आणि स्वतःचं घर तयार करूया.. घर कसं तयार करतात, ते आमची छोटी आर्किटेक्ट दाखवेल ना तुम्हाला!
आपल्याला एखाद्या गरुडासारखं किंवा विमानासारखं आकाशात उडता यावं, असं सरलाला नेहमी वाटायचं. “तुलाही नक्कीच त्यांच्यासारखं उडता येईल”, तिला शाळेतल्या नव्या ताई म्हणाल्या. उडणं आणि विमानं या दोन्ही गोष्टींबद्द्ल सरला काय काय शिकली, ते ती आपल्याला या पुस्तकात सांगते आहे.
भारतातल्या पर्णाच्छादित जंगलात वरचं जग आणि खालचं जग, ही दोन्हीही जगं परस्परांकडं नेहमीच संशयानंच बघायची. पण ज्यावेळी गोपा रानउंदराचं पुस्तक चुकून खाली फातिमाच्या डोक्यावर पडलं, त्यावेळी मात्र हे सगळं बदललं. जंगलामधली जैवविविधता आणि मैत्री यांबद्दल असणारी ही छानशी गोष्ट.
रीतीच्या शाळेला सुट्टी लागली आहे. पण तिला काही त्याचा आनंद झालेला नाही. शाळा नसली की मित्र-मैत्रिणी भेटत नाहीत, म्हणून रीतीला सुट्ट्या आवडत नाहीत. मग एक दिवस तिच्याकडे एक बोलका, पाळीव पोपट येतो – मिठू. त्याच्याशी रीतीची खास दोस्ती होते का? मैत्रीच्या या भावपूर्ण गोष्टीत वाचा...
दिल्लीच्या वाहतूक कोंडीत त्रस्त झालेल्या एका रिक्षाला अचानक जादुई अनुभव येतो. रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यासोबत तुम्हीही एक सफर करा. त्या चमचमत्या दुनियेचा हलका स्पर्श, तुम्हालाही नक्कीच आवडेल.
मधमाश्यांना शांतपणे काम करता येत नाही का? त्या खूप महत्त्वाचं काम करतात म्हणून आवाज होतो? बघा बरं काय काय करतात त्या?
भभलू अस्वलाचे आयुष्य रोमांचक आहे. तो ते अतिशय उत्साहाने घालवतो! त्याच्या रात्रीच्या साहसाची गोष्ट वाचा आणि तुम्हाला हिमालयांतील अस्वलांचे गुपित कळेल.
पपलू अगदी वेगळ्या प्रकारचा राक्षस होता. कुणाशी मारामारी करणं, कुणाला घाबरवणं, त्याला मुळीच आवडायचं नाही. पण त्याचे आवडते गावकरी जेव्हा संकटात सापडले तेव्हा त्यानं असा काही अवतार धारण केला की...
पाण्यावर उमललेल्या लाल-गुलाबी कमळांसारखे दिसणारे रोहित पक्षी ही निसर्गातील एक अद्भुत गोष्ट आहे. ते गुलाबी का बरं असतात? ते काय नट्टापट्टा करतात की काय? त्यांच्या इतक्या लवचिक मानेत हाड तरी असतं का? छायाचित्रांनी सजलेलं हे पुस्तक या अद्भुत पक्ष्यांबद्दल सर्व प्रश्नांची उत्तरं देतं.
दररोज सकाळी ट्यूब दाबून त्यातून टूथपेस्ट बाहेर काढणं किती सोप्पं आहे नाही? पण पेस्ट ट्यूबच्या आत जाते कशी, हे तुम्हाला ठाऊक आहे का? हे गुपित उलगडलं आहे या पुस्तकात.
तुम्हाला तुमच्या वाढदिवसाला काय करायला आवडेल, सांगा बरं. अंतराळात चालायची कल्पना कशी वाटते? या पुस्तकातली गोष्ट वाचून तुम्ही आनंदानं उडीच माराल... आणि जर गुरुत्वाकर्षण नसेल तर तुम्ही जिथे आहात तिथेच राहाल! चला तर मग, अंतराळयात्री गुलसोबत अवकाशात फेरफटका मारायला तयार व्हा.
कोट्टावी राजाला रात्री मुळीच झोप यायची नाही. दिवसा मात्र, त्याचे मंत्री जेव्हा काही कठीण समस्यांवर चर्चा करायचे, तेव्हा राजाला डुलक्या यायच्या. त्यानं सगळ्यांना यावरचा उपाय विचारला. मात्र कशाचाच उपयोग होईना. शेवटी एक दिवस... चला तर. कोट्टावी राजाच्या नगरीत जाऊन येऊ आणि पुढं काय घडलं पाहू.
कावळ्याला ना कोकिळेचा आवाज, ना मोरासारखा सुंदर तुरा. पण त्याचा एक गुण, गोड आवाज आणि सौंदर्य यांपेक्षा सरस आहे. कोणता आहे तो गुण?
तुम्हाला माहीत आहे का, काजवे का चमकतात? गंमत म्हणजे काजव्यांची बाळं आपल्या प्रकाशाचा उपयोग शत्रूला दूर पळवण्यासाठी करतात. या पुस्तकात बुडी मारलीत तर चमचम करत, अंधार उजळून टाकणाऱ्या काजव्याविषयी आणखीही बऱ्याच गमती कळतील.
By navigating this website, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation and analyze site usage.